Name of Work: Water Supply Scheme At Welturi Tq Ashti Dist Beed.(Under Jal Jeevan Mission )

सरपंच मंगेश साबळे यांचे अनोखे आंदोलन
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातल्या गेवराई पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर महिला वेशात आंदोलन केले. त्यांनी साडी नेसली, डोक्यावर हंडा घेतला आणि महिलांच्या पाणीटंचाईच्या समस्येवर सरकारचे लक्ष वेधले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या दालनासमोर हे आंदोलन करण्यात आले. चार वर्षांपासून रखडलेले जल जीवन मिशनचे काम पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली.
गेल्या ४ वर्षांपासून महिलांची वणवण सुरूच!
२०२०-२१ मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत गावासाठी १ कोटी ८० लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. मात्र,पाईपलाइन टाकून ४ वर्षे झाली, पण पाणीपुरवठा सुरू नाही. गावातील महिला अजूनही मैलोनमैल पाण्यासाठी फिरतात. गावातील महिलांच्या व्यथा ऐकून सरपंच मंगेश साबळे यांनी यावर आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आणि आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
"लाडक्या बहिणीला प्यायला पाणी नाही, अधिकारी झोपलेत का?"
सरपंच मंगेश साबळे यांनी प्रशासनावर कठोर टीका केली. "चार वर्ष झाले, महिलांना प्यायला पाणी मिळत नाही. योजनेला निधी मिळतो, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही! अधिकारी काम करीत नाहीत, यात भ्रष्टाचार झाला का? सरकारच्या नव्या घोषणांपूर्वी आधीच्या योजनांची अंमलबजावणी पूर्ण झाली पाहिजे, अशी मागणी मंगशे साबळे यांनी केली.
Union Budget : तुमचा पगार १२ लाख असेल तर किती होईल बचत? जाणून घ्या गणित
अर्थसंकल्पात जल जीवन मिशनचा विस्तार - पण काम अपूर्णच!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जल जीवन मिशनला २०२८ पर्यंत मुदतवाढ दिल्याची घोषणा केली. १५ कोटी कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्यात आले. २०२८ पर्यंत १००% कव्हरेज करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा मजबूत करण्यासाठी राज्य सरकारांशी भागीदारी.
मात्र, योजनेतील प्रलंबित प्रकल्प आणि अपूर्ण कामांमुळे अनेक ठिकाणी विरोध होत आहे. सरकारच्या मते, ही योजना यशस्वीपणे राबवली जात आहे. मात्र, अनेक गावांमध्ये अजूनही लोकांना शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
घोषणांपेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी गरजेची!
सरकारकडून नवनवीन योजनांच्या घोषणा केल्या जातात, पण ग्रामीण भागातील समस्या सुटताना दिसत नाहीत.जल जीवन मिशनचा विस्तार हा चांगला निर्णय असला तरी आधीची प्रलंबित कामे पूर्ण होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात महिलांना अजूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
Union Budget 2025 : आता प्रत्येक घरात पोहोचेल नळाचे पाणी, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!
केंद्रीय अर्थसंकल्प 2025

0 Comments