अमेरिका स्वतंत्र झाल्यानंतरची ही एक घटना आहे.
रस्त्याच्या कडेने जात असताना एक लष्कराची गाडी अडचणीच्या जागेत अडकली. गाडीतील शिपाई उतरून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांच्या वरचा अंमलदार फक्त हुकुम देत होता. त्यांने मदत केली असती तर गाडी लगेच निघाली असती, पण तो साहेब होता. हुकुम देत नुसतेच उभे राहिला. तेवढ्यात तिकडून एक गाडी आली. त्यातून एक सज्जन उतरले. आणि गाडी बाहेर काढण्यासाठी मदत करू लागले. त्यांच्या मदतीमुळे गाडी लगेच बाहेर निघाली. दुसऱ्या गाडीतुन आलेला तो सज्जन त्या अंमलदाराला म्हणाला, पुन्हा गरज पडली तर मला बोलावत जा. आणि त्यांनी आपल्या कोटाच्या खिशात हात घातला. आपला पत्ता असलेले कार्ड बाहेर काढल आणि त्या अमलदाराला दिले. त्यांनी ते पाहिलं आणि त्याला दरदरून घाम फुटला. कारण मदतीला आलेला तो सज्जन अमेरिकेचा राष्ट्रअध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन होता.


🍂तात्पर्य : सत्कृत्यासाठी कष्ट करताना आपण आपलं पद, प्रतिष्ठा आणि अहंकार या गोष्टी बाजुला ठेवल्या पाहीजेतपद नव्हे तर नम्रता, विचारांची उंची, कर्तृत्व हा तुमचा मोठेपणा ठरवतात....!!..

Post a Comment

0 Comments