हरयाणातील आदमपूर मंडी गावातील एका तरुणाचं स्वप्नं होतं- इंजिनिअर बनायचं. पण त्याची झेप काही इंटरपुढे गेली नाही. बरं झालं तो इंजिनिअर झाला नाही ते. नाहीतर कुठेतरी पाच पंचवीस हजाराची नोकरी करून पगाराच्या दिवसाची वाट बघत बसला असता. आज त्याच्या कंपन्यामद्धे हजारो लोक काम करताहेत आणि त्याच्या सर्व कंपन्यांचं बाजारमुल्य आहे तब्बल ४२ हजार कोटी. १९९२ मद्धे देशात सर्व प्रथम २४ तास चालणारी वाहिनी आणून अभूतपूर्व क्रांती घडवून देशातील लाखो-करोडो लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या सुभाष चंद्राची कहाणी अर्धवट शिक्षण घेतलेल्या लाखो तरुणांना प्रेरणा देणारी ठरावी.
सुभाष चंद्रा अर्धवट शिक्षण घेऊन घराबाहेर पडला तेच मुळी उराशी आणखी एक स्वप्न घेऊन. नोकरी करायची नाही तर काहीतरी उद्योग धंदाच करायचा. त्या दिशेने त्याने पावले टाकायला सुरुवात केली. ऐन तिशीत असताना तॊ एका पाकेजिंगच्या औद्योगिक प्रदर्शनाला गेला. तेव्हाच त्याच्या मनात आपणही पाकेजिंग कंपनी सुरु करायचा विचार केला. देशात त्याकाळी अल्युमिनिअम ट्यूबची चलती होती. पण भविष्यात अल्युमिनिअम नव्हे तर ल्यामीनेटेडट्यूबची चलती असेल हे हेरून त्याने एस्सेल प्याकेजिंग नावाने कंपनी सुरु केली. टूथ पेस्ट, औषधे, सौंदर्य प्रसाधने, अन्न पदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तूसाठी आवश्यक अशा प्याकिंगची निर्मिती त्याने सुरु केली. आज त्याची हि कंपनी एस्सेल प्रोप्यक नावाने ओळखली जाते. आशियातील ती सर्वाधिक मोठी कंपनी तर आहेच पण जगातली ती दुसर्या क्रमांकाची कंपनी आहे. परदेशी पर्यटन करताना एका अम्युसमेंट पार्कमध्ये फिरताना त्याला भारतात आशिया खंडातली सर्वात मोठी मनोरंजन नगरी उभारायची कल्पना सुचली आणि मुंबईच्या जवळ त्याने ६४ एकर जागेवर १९८८ मध्ये एस्सेल वर्ल्ड उभे केले. नंतर जवळच वाटर किंग्डमहि उभारले. देशातील लाखो लोक त्याच्या मनोरंजन नगरीला भेट देतात.
एकदा तो मुंबईच्या दूरदर्शन केंद्रावर आपल्या मित्राला भेटायला गेला. त्या काळात दूरदर्शनवर केवळ संध्याकाळी काही रटाळ कार्यक्रम असायचे. तेव्हाच त्याला २४ तास चालणारी वाहिनी काढायची कल्पना सुचली. तेव्हा सर्वच अनुभवी लोकांनी त्याला वेड्यात काढले. कमावलेले सारे काही तो एका फटक्यात गमावणार असाच त्या क्षेत्रातील अनुभवी लोकांचा अंदाज होता., पण सुभाषला स्वतःवर विश्वास होता. त्या क्षेत्रातील कोणताही अनुभव गाठीशी नसताना त्याने ऑक्टोबर १९९२ रोजी झी टीवि.हि २४ तास चालणारी वाहिनी सुरु केली. लोकांनी त्याच्या वाहिनीला प्रचंड प्रतिसाद दिला. नंतर त्याने २४ तास बातम्या देणारी झी न्यूस वाहिनी सुरु केली. आणि मग एकामागून एक प्रमुख भाषेतील वाहिन्या काढायचा त्याने सपाटाच लावला. सुभाष चंद्राला प्रचंड यश मिळालं. त्याच्या यशाने प्रेरित होऊन नंतर शेकडो उद्योजकांनी त्याच्या पावलावर पाउल टाकत तब्बल ४०० वाहिन्या सुरु केल्या. येत्या काळात आणखी ४०० वाहिन्या येणार आहेत. सुभाष च्या त्या एका कल्पनेमुळे देशातील लाखो लोकांना रोजगार मिळाला. त्यानंतर सुभाषने प्ले विन लॉटरी नावाने ऑनलाइन लॉटरी सुरु केली. तिलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. नंतर त्याने डिश टीवी, सिटी केबल, फुन सिनेमा नावाने चित्रपट गृह सुरु केली. गोल्ड रेफायानिंगकंपनीही काढली. डीएनए नावाने इंग्रजी वृत्तपत्र सुरु केले. इन्फ्रा स्ट्रक्चर क्षेत्रातही मुसंडी मारली.

ज्या क्षेत्रात पहिले कोणीही नव्हते त्या क्षेत्रात नव्याने उदयोग उभारून सुभाष चंद्राने जगासमोर एक अचंभित करणार आदर्श उभा केला. आज शेकडो तरुणांनी उदयोग क्षेत्रात उडी घ्यावी म्हणून ते झी टीवी वर सुभाष चंद्रा शो कार्यक्रम सादर करतात. देशातील २१ राज्यातील ११ लाख गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी एकल विद्यालय फौंडेशनची स्थापना केलीय.

Post a Comment

0 Comments