श्रीमंतीचा फंडा
मुंबई चा मळलेल्या कपड्यांवर व्यवसाय करणारा श्रीमंत समोसे विक्रेता
सत्य घटनेवर आधारित
बद्रीनाथ नावाचे एक मुंबई कर चर्चगेट वरून ट्रेन पकडतो. त्याच्या शेजारी एक समोसे वाला रिकामे टोपले घेवून बसलेला असतो. सहज बद्रीनाथ हा त्या समोसे वाल्याशी संभाषण सुरु करतो.
बद्रीनाथ : आज वाटते तुम्ही तुमच्याकडचे सर्व सामोसे संपवले?
समोसा विक्रेता : हो. देवाच्या कृपेने आज माझी विक्री चांगली झाली.
बद्रीनाथ : मला खरच तुमच्या लोकांचे खूप वाईट वाटते. तुम्ही येवढ्या मेहनतीचे काम करून थकत नाही का?
समोसा विक्रेता : काय करू शकतो साहेब? दररोज वजन घेवून, गरम समोस्याचे चटके सहन करत प्रत्येक समोस्यामागे आम्हाला ७५ पैसे कमिशन मिळते.
बद्रीनाथ : ओह, फक्त इतकेच मिळतात? तुम्ही दिवसाला सरासरी किती समोसे विकतात?
समोसा विक्रेता : गर्दीच्या वेळेस आम्ही दिवसाला ४००० ते ५००० हजार समोसे विकतो. इतर दिवशी सरासरी ३००० हजार समोसे विकतो.
काही वेळासाठी मी आश्चर्यचकित झालो. हा समोसेवाला प्रत्येक समोस्यापाठी मिळणाऱ्या ७५ पैसे नफ्यासाठी दिवसाला ३००० हजार समोसे विकतो, म्हणजे हा दिवसाला २००० रुपये आणि महिन्याला ६०००० रुपये कमावतो.
मी टाईमपास सोडून अजून खोडून विचारयला लागतो.
बद्रीनाथ : तुम्ही समोसे स्वतः बनवता का?
समोसा विक्रेता : नाही साहेब. समोसे बनवण्यवाल्याकडून आम्ही समोसे विकण्यासाठी विकत घेतो. सामोसे विकून झाल्यावर आम्ही त्याला सर्व पैसे देवून टाकतो व प्रत्येक समोस्यामागे तो आम्हाला ७५ पैसे देतो. (मी आश्चर्यचकित होवून ऐकतच बसतो.). एक महत्वाची गोष्ट आहे कि आम्ही हा सर्व मेहनतीने कमावलेला पैसा दररोजच्या जगण्यावर खर्च करतो व उरलेला पैसा हा दुसऱ्या व्यवसायात गुंतवतो.
बद्रीनाथ : दुसरे व्यवसाय? ते कुठले आहेत?
समोसा विक्रेता : जमीन खरेदी विक्रीचा. २००७ साली मी १.५ दीड एकर जमीन पालघर येथे विकत घेतली व काही महिन्यापूर्वी ती ६० लाखाला विकली. आता मी उमरोली इथे अजून २० लाख रुपये देवून जमीन विकत घेतली.
बद्रीनाथ : आणि बाकीच्या रकमेचे काय केले?
समोसा विक्रेता : २० लाख रुपये हे माझ्या मुलीच्या लग्नासाठी बाजूला काढून ठेवले व उरलेले २० लाख रुपये हे फिक्स डीपोझिट मध्ये टाकले.
बद्रीनाथ : तुझे शिक्षण किती झाले?
समोसा विक्रेता : मी तीसरी पर्यंत शिकलो. मी चौथीला असताना शिक्षण सोडून दिले. पण मला लिहिता वाचता येते. साहेब तुमच्यासारखे नवीन चांगले कपडे घालणारे, टाय घालणारे, महागडे बुट घालणारे, इंग्रजी भाषा बोलणारे आणि एसी च्या ऑफिस मध्ये बसून काम करणारे खूप लोक बघितली. पण मला नाही वाटत कि तुम्ही आमच्या सारखे जे मळलेले कपडे घालून फेरीवाले समोसे व इतर खाद्य पदार्थ विकणाऱ्यापेक्षा जास्त किंवा त्यांच्या इतके कमवत असाल.
बद्रीनाथ : (मनात विचार करतो) ह्या मुद्द्यावर मी काहीच बोलू शकत नाही. शेवटी मी एका लखपती शी बोलत होतो.
ट्रेन खर स्टेशन ला थांबते. समोसेवाला आल्या जागेवरू उठतो
समोसा विक्रेता : साहेब माझे स्टेशन आले. आपला दिवस शुभ जाओ.
बद्रीनाथ : काळजी घे.
उद्योजक, व्यवसायिक आणि गुंतवणूकदार तुम्ही मोठ मोठ्या विद्यापीठात शिक्षण घेवून, क्लास, कोर्स करून बनू शकत नाहीत. दृष्टीकोन, परिस्थिती नुसार जगत, मेंदूने जग बघत बनू शकता.
एकदा का हि मानसिकता आली कि मग तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एकप्रकारे आकर्षणाचा सिद्धांत बोलू शकतो.
हाच प्रगतीचा नियम तुम्ही तुमचे सर्वांगीण आयुष्य सुखकर करण्यासाठी वापरू शकतात.
Happy diwali 🪔🎇 2024
0 Comments